- कामावर हजर होण्यासाठी संस्थेचे नियम व अटी पूर्णपणे वाचून व समजून घेणे.
- सदर नियम व अटी आपल्यास बंधनकारक राहतील याची नोंद घ्यावी.
- कामावर भरती होताना कार्यालयीन अर्ज पूर्णपणे भरून देणे आवश्यक आहे.
- ड्युटीवर जाताना फर्स्ट डिफेन्स सिक्योरिटी यांच्या संस्थेचे ड्रेस कोड आपणास लागू राहतील.
- ड्युटी बदल करताना किमान 10 मिनिटे लवकर जाणे अनिवार्य आहे.
- सुट्टी पाहिजे असल्यास 24 तास अगोदर लिखित अर्ज करावा अथवा तोंडी सांगावे.
- अचानक सुट्टी घेतल्यास 300/- रुपये दंड आकारला जाईल याची नोंद घ्यावी.
- काम सोडण्याआधी 15 दिवस अगोदर अर्ज करावा. अचानक काम सोडल्यास राहिलेल्या पगारातून दंड वजा केला जाईल याची नोंद घ्यावी.
- अर्ज दिल्यानंतर 15 दिवस काम करणे बंधनकारक राहील.
- मासिक वेतन महिन्याच्या 10 ते 13 तारखेपर्यंतच्या कालावधीत होईल.
- ड्युटीवर झोपल्यास त्या दिवसाचा पगार मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
- ड्युटीवर दारू पिऊन आढळल्यास 2000/- रुपये पगारातून कपात केली जाईल याची नोंद घ्यावी.
- आगोदर काही आजार असल्यास (मेडिकल प्रॉब्लेम) त्याची पूर्व-सूचना देण्यात यावी.
- प्रत्येक गार्डला ड्युटीवर 20 दिवस भरल्यानंतर 20 तारखेला 2000/- रुपये अॅडव्हान्स मिळतील.
- कामावर हजर झाल्यानंतर 30 दिवसानंतर पोलीस व्हेरिफिकेशन देणे बंधनकारक राहील. कपड्याचे पैसे पहिल्या महिन्यातून कपात केले जातील.
- प्रत्येक गार्डला वेगवेगळ्या ठिकाणी ड्युटी लावण्यात येईल.
- कोणत्याही प्रकारची देवाण-घेवाण व कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर वस्तू ठेवू नये.
- सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आपला ड्रेस स्वच्छ, टर्नआउट व वर्तन योग्य ठेवणे बंधनकारक राहील.
- ड्युटीवर पान, तंबाखू, गुटखा खाण्यास व सिगारेट ओढण्यास सक्त मनाई आहे.
- संस्थेचे नियम व अटी मी पूर्णपणे वाचून व समजून घेतले आहेत. मी संस्थेच्या नियम व अटींचे उल्लंघन केल्यास मी स्वतः माननीय संचालक यांचा दंड स्वीकारण्यास तयार आहे. अशी खाली मी सही करतो.
| तपशील |
शर्ट |
पॅन्ट |
टोपी |
टाय |
लाईन शर्ट |
शूज |
बेल्ट |
बॅच |
आयकार्ड |
दंड |
एकूण किंमत |
| किंमत |
450 |
375 |
75 |
450 |
30 |
10 |
90 |
380 |
30 |
95 |
|
नाव : _______________________
सही : _______________________